पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Friday, December 2, 2022

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार 

त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार 

झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फार

कळले नाही कसे संपले दिवस अपुले चार 

पिळणकरांनी आतड्यांक पिळच घातल्यानी

सुर्व्यांनी तर  कुप्पममधना निवडणूक लडवल्यानी

तीन मुख्याध्यापक बनले आमचे आधार 

कळले नाही कसे संपले दिवस अपुले चार 

विलासाचो विकास कुप्पमात मात्र जोमात 

पालवांचे पुष्पगुच्छ लय भारी अभिनंदनात

तर ब्लॉग लिवनारे गावले कुबल पटाईत फार 

कळले नाही कसे संपले दिवस अपुले चार 

कॅन्टीन आसांदे नायतर त्यांचा ट्रेनिंग सेंटर 

शिरा पडांदे ह्याच आमचा प्रसिद्ध उत्तर

कुप्पमात मालवणी झाली लाडाची फार 

कळले नाही कसे संपले दिवस अपुले चार 

उद्यापासून आपापल्या ठिकाणात जाव 

खयतरी काळजात तुमचा ठिकाण ऱ्हवात

ब्यागेत भरली मॉडेला 

पाय जड झाले फार

कळले नाही कसे संपले दिवस अपुले चार 

विश्वासाचा प्रमेय 

सिद्धतेशिवाय सिद्ध झाला

तीनव शिक्षकभगिनींनी खरा घरपण सांबाळला

सगळा कुटुंब कसा

सुकात नांदला फार 

कळले नाही कसे संपले दिवस अपुले चार 

©️ प्रसाद बागवे  ( मुणगे हायस्कुल , मुणगे )



Sunday, January 5, 2020

शेर्पे - साळीस्ते केंद्रातील शिक्षक सहल : एक अविस्मरणीय अनुभव : सन २०२०

          आज सकाळी ठिक ६ वाजता खारेपाटण वरून , तळेरेवरून रवाना झालेली शिक्षकांची सहल म्हणजे एक अविस्मरणीय असा अनुभव होता. दोन टुरिस्ट गाड्यांमधून निघालेले प्रवासी शिक्षक शिक्षिका वेळीच उपस्थित झाल्याने अतिशय नियोजनपूर्वक सहल घडून आली. सर्वांनी उत्साहाने प्रवासात गाणी म्हणत म्हणत प्रवास केल्याने ' कौटुंबिक वातावरण ' निर्माण झाले. शिक्षकांसाठी सुद्धा आयुष्यात असा एखादा दिवस आवश्यकच असतो. कारण दैनंदिन जीवनातील ताण- तणाव विसरून , शाळेतील तोचतोचपणा यामुळे आलेली पठारावस्था अलगद दूर करणारी सहल असे वर्णन  केले तरी ते वावगे ठरू नये.
          प्रेमळ शिक्षण विस्तार अधिकारी पाताडेसाहेब , नेहमी प्रेरणा देणारे केंद्रप्रमुख सदगुरू कुबलसर यांच्या नियोजनातून साकार झालेली शिक्षकांची ' शैक्षणिक सहल ' खरंच खूप उत्साहवर्धक ठरली. असे सहलीचे वातावरण होते कि जणू आपण सर्वजण हसत खेळत नवनवीन पाहत आहोत.
          रेडीचा गणपती , तेरेखोलची खाडी, शिरोडा बीच , सुरमई थाळी, सुरूचे बन , आरवलीचे वेतोबा मंदिर , मिठागरे , पिंगुळीचे वॉटरपार्क ही आजच्या पर्यटनातील सौदर्यस्थळे होती. पर्यटक नुसते फिरत नाहीत , तर आयुष्यातील आपला उनाड दिवस साजरा करत असताना आपोआप रिलॅक्स होत जातात. अंताक्षरी , नृत्य करत साजरा केलेला आनंद कसा विसरला जाईल कधी , नाही का ?
           एवढा आनंद मिळवून दिल्याबद्दल संयोजक पाताडेसाहेब , कुबलसाहेब आणि श्रीराम विभुतेसर यांचे सर्वांच्या वतीने विशेष आभार .








































































































































































































🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...