पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Tuesday, February 12, 2019

वेंगसर घाडीवाडी शाळेत शिक्षण परिषद संपन्न

वेंगसर दिनांक : ८ फेब्रुवारी : शुक्रवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी वेंगसर व तिथवली या दोन केंद्रांची संयुक्त शिक्षण परिषद वेंगसर घाडीवाडी शाळेत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
     शाळेचे मुख्याध्यापक श्री. अतिश कांबळेसर आणि उपशिक्षक श्री. प्रवीण डोकेसर यांनी उत्तम नियोजन करत शिक्षण परिषद पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. शालेय वातावरण शैक्षणिक करून त्यांनी जी शैक्षणिक वातावरण निर्मिती केली होती त्यामुळे शिक्षण परिषदेला एका वेगळ्या शैक्षणिक उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम झाले होते. खऱ्या अर्थाने एका छोट्या शाळेतही इतक्या चांगल्या प्रकारे नियोजन व कार्यवाही होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले.
     शिक्षण परिषदेची सुरुवात दीपप्रज्ज्वलन करून झाली. परिषदेला जिल्हा विद्या प्राधिकरण म्हणजेच डाएटचे प्राचार्य श्री. अरुण पाटीलसर , विषय सहाय्यक श्री. भलासर , श्री. महेश गावडेसर , केंद्रप्रमुख श्री. गोविंद चव्हाणसर, केंद्रप्रमुख श्री. विजय केळकरसर ,श्रीम. नंदिनी पवार, श्रीम. सरिता जाधव , श्री. तापेकर, श्री. तानाजी कांबळेसर ( सर्व विषयतज्ज्ञ ) व दोन्ही केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शारदामातेचे पूजन करण्यात आले.
     श्री. प्रवीण कुबल यांनी ' ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ' ही प्रार्थना म्हटली. सर्वांनी प्रार्थना सुमधुर स्वरामध्ये म्हटली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सौ. पल्लवी गायकवाड, उपशिक्षिका मांगवली धनगरवाडा यांनी इयत्ता १ ली च्या गणित पाठ्यपुस्तकाचे परीक्षण केले. त्यात त्यांनी मुखपृष्ठ , मलपृष्ठ, अंतरंग, बाह्यरंग, उपक्रम यांचा प्रामुख्याने उल्लेख केला. त्यानंतर शिरीन सय्यद यांनी आपल्याला आलेला वार्षिक तपासणीचा अनुभव सविस्तर कथन केला. नाजनीन मुल्ला यांनी उंबर्डे उर्दू शाळेची ppt दाखवत शाळेचे उपक्रम सांगितले. digital school या संकल्पनेचा उपयोग करत सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना त्यांना या नवीन अनुभवांची भर पडली. श्री. अतिश कांबळे आणि श्री. प्रवीण डोके यांच्या प्रयत्नाने मुलांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
     त्यानंतर श्री. अतिश कांबळेसर यांनी Kinemaster या app चा वापर करून video निर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यात त्यांनी व्हिडीओ करताना देतानाचे इफेक्ट स्पष्ट केले.
     या परिषदेचे औचित्त्य साधून दोन्ही केंद्रातील यशस्वी विद्यार्थांचे व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. बदली होऊन कुडाळ तालुक्यात गेलेले वेंगसर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. जि. बी. चव्हाणसर यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी वेंगसर केंद्राच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. निरोप देताना चव्हाणसर भावूक झाले होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले. श्री. जी. बी. चव्हाण सर यांनी वेंगसर केंद्रातील सर्व शाळांना ' शिवाजी महाराजांची प्रतिमा ' सप्रेम भेट दिली. सर्व शिक्षकांनी आनंदाने प्रतिमा स्विकारल्या.
     त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. वेंगसर घाडीवाडी शाळेने उत्तम भोजनाची सोय केली होती. वेंगसर घाडीवाडी शाळेच्या अध्यक्षा यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या शाळेत काम करणाऱ्या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
     श्री. अरुण पाटील सर यांनी अप्रगत मुले, अध्ययन स्तर, असर अहवाल,
शाळा सिद्धी या विविध महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकत सर्व शिक्षकांना प्रेरणा देत मार्गदर्शन केले. श्री. महेश गावडेसर यांनी समाजश्श्त्र या विषयाचे अध्यापन करताना वापरावयाची कौशल्ये कथन केली.
     श्री.विजय केळकरसर यांनी शिक्षण परिषदेविषयी व इतर शैक्षणिक , प्रशासकीय विषयांवर प्रसंगानुरूप अधिक माहिती दिली. श्री. प्रवीण डोके सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.































🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...