आज मला माझ्या गावच्या म्हणजे किर्लोस आंबवणेवाडी शाळेत जाण्याचा योग आला. खरं तर माझ्या गावातील शाळा माझ्या घराच्या रस्त्यावरच आहे. पण ज्या दिवशी मी गावात जातो , तेव्हा शाळा बंद असते. त्यामुळे मनात असूनही शाळेत जाणं होत नाही. आज मात्र मी रजेवर असल्याने शाळा उघडी होती. आमच्या घरी नवमी निमित्त सवाष्ण महिलांना बोलावले असल्याने माझं घरी जाणं झालं . आता मात्र योग्य छान जुळून आलेला होता. मनात तीव्र इच्छा दाटून आलेली होती. शाळेत जायचेच असे ठरवूनच गावात गेलो होतो. घरी गेलो. कुटुंबातील सर्व सदस्यांना घरी सोडले. घरी सांगून शाळेकडे तडक निघालो.
शाळेत प्रवेश केला. वर्गात डोकावून पाहिले. वर्गातील मुले माझ्याकडे पाहून आश्चर्यचकित झालेली दिसत होती. कारण त्यांनी मला यापूर्वी कधी शाळेत पाहिलेले नव्हते. मी याच गावचा असलो तरी त्या मुलांनी मला शाळेत अपेक्षित धरलेले नसेल हे खरंच आहे. त्यांनी मला कार्यालयाची दिशा दाखवली. मी बरोबर कार्यालयाकडे वळलो. कार्यालयात सर्व शिक्षक होतेच. मी कार्यालयात जाण्याआधीच सर्वांनी माझे हसतमुखाने स्वागत केले आणि बसण्यास सांगितले. मी आनंदाने बसलो. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मुख्याध्यापक शेंगाळसर, सावंतसर , कडुलकरमॅडम आणि राजममॅडम चारही शिक्षकांशी मारलेल्या गप्पा म्हणजे हृदय संवाद होता. त्यांनी माझ्याशी केलेले अतिआदरपूर्वक बोलणे मला अधिक आनंदित करून जात होते. मग मीच शिक्षकांकडे मुलांशी संवाद साधू का ? असे विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. त्यापूर्वी त्यांनी मला शाळेतील उपक्रमाची पारदर्शिका दाखवली. मी ती पाहताना अधिकच उत्स्फूर्त होत होतो. माझ्या गावच्या शाळेत फक्त १४ मुले आहेत. १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग आहेत. एकूण ५ शिक्षक जे कार्य करत आहेत ते वाखाणण्यासारखेच आहे. सर्व उपक्रम राबवताना त्याला मूल्यशिक्षणाचा स्पर्श केलेला आढळून आला. मलाही त्यातून खूप शिकायला मिळाले. आपण कितीही उपक्रम राबवत असलो तरी त्यात अजूनही काहीतरी कमतरता राहून जाते. ती कमतरता भरून काढण्याचे औषध मला आज मिळाले होते.
मी मुलांसमोर बोलायला सुरुवात केली. मुले माझ्याकडे पाहत होती. मी त्यांच्याकडेच बघून बोलत होतो. मी त्यांच्याच गावचा आहे आणि मी या शाळेत येण्याची शक्यता होती हे सुद्धा मी बोलता बोलता सांगून गेलो. शाळेचे वातावरण व शैक्षणिक परिस्थिती उत्तम होतीच. मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसत होती. माझं बोलणं ती मुले शांत चित्ताने ऐकून घेत होती. ती ऐकत होती म्हणून मी बोलतच होतो. त्यांना माझे बोलणे ऐकावेसे वाटत होते, असं असेल कदाचित. मी त्यांना सांगितले कि मी शिक्षक आहे आणि तुम्ही सुद्धा पुढे शिक्षक होऊ शकता. तुम्ही खूप मोठे व्हायचे आहे. शिक्षकांकडून जितकं शिकता येईल तितकं शिकून घ्यायला हवं. आणि प्रत्येकाने वेगळ्या गोष्टी न करता प्रत्येक गोष्ट करताना ती वेगळेपणाने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. मला असं काहीतरी तात्विक बोलायला आवडत होतं , पण मुलांना आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी यासाठी तसं सांगून माझ्या गावातील मुलं एक आदर्श विद्यार्थी घडावीत हा निर्मल उद्देश ठेवूनच मी बोलत होतो.
मग मी ' माझा श्याम गुणाचा गं ....माझा बाळ गुणाचा गं .....हे गाणं छान म्हणण्याचा प्रयत्न केला. मुलांनाही त्याचे ध्रुवपद उच्चारण्यास सांगितले. मुलांनीही छान साथ दिली. मुलांनाही ते गाणे आवडल्याचे दिसून येत होते. खरंच आज माझ्यासाठी हा एक उत्तम अनुभव होता. ज्या शाळेत मी शिकलो नाही, माझ्या घरातील बाबा, काका, आत्या, काकांची मुले ज्या शाळेत शिकली त्या शाळेत जाऊन मुलांशी हितगुज साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद गगनाला गवसणी घालणारा ठरला तो त्यासाठीच.