चिरा चिरा हा घडवावा , कळस किर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा , थेंब आम्ही तर सागर हे.....
Thursday, November 1, 2018
कुमार - अमर अंकुश गुरव. इयत्ता - सहावी - गणित- अध्ययन स्तर - गुणाकार. उपाययोजना- प्रथम एक अंकी व एक अंकी गुणाकार घेतला. यासाठी त्याला वेगळी २०० पानी वही दिली. त्यानंतर दोन अंकी व एक अंकी गुणाकार घेतला. २ ते ९ पर्यंतचे पाढे पाठ करून घेतले. अडखळत म्हणणाऱ्या पाढ्यांचा सराव घेण्यासाठी त्याच वर्गातील मुलांचा वापर करून घेतला. नमुना उदाहरणे बनवून ती सोडवून घेतली. दोन अंकी व दोन अंकी संख्यांचा गुणाकार घेतला. १० ते २० पर्यंतचे पाढे सराव घेतला. सराव नसलेल्या पाढ्यांचा अधिक सराव करून घेतला. सहावी व सातवीच्या हुशार मुलांचा त्यासाठी वापर करून घेतला. त्यानंतर तीन अंकी व एक अंकी संख्यांचा गुणाकार घेतला. आवश्यक तेथे यु ट्यूबचा वापर करून घेतला. पाढ्यांची सलग संथा दिली. मुख्याध्यापकांसमोर त्याची चाचणी घेतली. तो स्वत: प्रगत होत असल्याची त्याला कल्पना दिली. वहीवर पहिला दिवस , दुसरा दिवस अशा प्रकारे नियोजन करून सराव घेणे सुरु ठेवले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
🛑 कुप्पमातले दिस लय भारी
🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...
No comments:
Post a Comment