पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, November 1, 2018

दिवाळी अभ्यास - सन २०१८-१९ - मांगवली नं. १ अ. क्र. दिवाळी सुट्टीत करावयाचा सरावात्मक अभ्यास / उपक्रम / स्वाध्याय / गृहकार्य पूर्ण/अपूर्ण १ दररोज ५ ओळी मराठी, हिंदी व इंग्रजीचे लेखन सुवाच्च अक्षरात करा. शिरोरेघा द्या. २ आपल्या वरच्या वर्गातील मराठी पुस्तकातील ५ परिच्छेद पाहून तसेच लिहा. ३ ‘ दिवाळी ‘ या सणामध्ये आपण काय करतो ते २५ ओळींमध्ये लिहा. निबंध लिहा. ४ ‘ माझी शाळा ‘ ,’माझे बाबा', ‘माझी आई ‘ ,’ माझे आजोबा' हे ४ निबंध लिहा. ५ कोणत्याही विषयावर तुम्ही स्वतः एक कविता लिहा. एक कथा , एक विनोद लिहा. ६ डॉक्टर आणि पेशंट, शिक्षक आणि विद्यार्थी , आई आणि मुलगी यांच्यातील संवाद लिहा. ७ सामान्य नामे, विशेष नामे, भाववाचक नामे यांची पुस्तकातून यादी तयार करा. ८ भूमितीतील मुलभूत संबोध व त्रिकोणांचे प्रकार आकृतीसह काढा व नावे द्या. ९ तीन अंकी १० संख्या लिहा. त्यापासून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करा. १० १ ते ३० पर्यंतचे पाढे लिहा.पाठ करा. सराव करा. १ ते ३० पर्यंतचे वर्ग व घन लिहा.पाठ करा. ११ मसावि व लसावि ची प्रत्येकी १० उदाहरणे सोडवा. कुटुंबातील सदस्यांच्या वयाचा स्तंभालेख १२ तुम्ही,कुटुंब, गाव, परिसर, शाळा, वर्ग या संदर्भाने इंग्रजी व हिंदी प्रत्येकी ५ प्रश्न बनवा. १३ तुम्हाला माहित असलेले / वाचता येणारे इंग्रजी ३०० शब्द लिहून आणा. उच्चार / अर्थ नको. १४ My School, My self, My Friend, My Body यांवर इंग्रजी १० ओळींचा निबंध लिहा. वरील दिवाळी अभ्यास हा मुलांना सरावासाठी देण्यात आलेला असून तो केल्यामुळे मुले कायम अभ्यासात राहतील. सुट्टी असली तरी वाचन, लेखन त्यानिमित्ताने सुरु राहील हा मुख्य उद्देश आहे. हा पायाभूत अभ्यास असल्याने तो सहावी व सातवीच्या दोन्ही वर्गांना समान देण्यात आलेला आहे. जो अभ्यास पूर्ण होईल त्याच्यापुढे मुलांनी किंवा पालकांनी पूर्ण झाल्याची खुण √ करावी. शाळा सुरु झाल्यानंतर पूर्ण झालेला अभ्यास संचयिकेत फाईल करून ठेवावा. सन २०१८ चे दिप वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे , आरोग्यदायक व अभ्यासमय जावो अशी श्रीदेव मंगेश्वर चरणी प्रार्थना आणि दिवाळीच्या फराळमय शुभेच्छा. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आपल्या शाळेचा Bolgspot बनवण्यात आला आहे. Online भेट द्या. http://mangawali.blogspot.com/ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...