माझा बाळ गुणाचा गं ....माझा श्याम गुणाचा गं.....
तो होऊ दे मोठा मोठा .....
मग नाही आनंदा तोटा .......
व्हावा लाडका साऱ्यांचा गं....माझा बाळ गुणाचा गं !! धृ !!
माझ्या प्राणांचा विसावा तो ....
दृष्टीसमोर दिसावा तो ....
नको लागाया कधीही त्याला ....
वारा दुःखाचा गं ........माझा बाळ गुणाचा गं !! १ !!
माझ्या प्रेमाची ऊब ही त्याला..
माझ्या नजरेचा धाकही त्याला ....
मनात रूजवू दे ...
जनात शिकवू दे ....
धडा सत्याचा गं,,,.... माझा बाळ गुणाचा गं......... !! २ !!
त्याचा सर्वांशी स्नेह जुळावा....
पाय ध्येयाकडेच वळावा....
अंतरंगातून झरा फुटावा ....
विश्वप्रेमाचा गं....माझा बाळ गुणाचा गं..... !! ३ !!
No comments:
Post a Comment