चिरा चिरा हा घडवावा , कळस किर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा , थेंब आम्ही तर सागर हे.....
Thursday, November 1, 2018
मांगवली नं. १ शाळास्तर रुबेला लसीकरण जाणीव-जागृती - पालक कार्यशाळा सन्माननीय सर्व पालकवर्ग , यांसी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. कळविण्यात येते कि, शुक्रवार दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजी मांगवली नं. १ शाळास्तरीय रुबेला लसीकरण जाणीव-जागृती- पालक कार्यशाळा सकाळी ठिक १० ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पालकांनी वेळेवर उपस्थित राहून रुबेला लसीकरणाबाबत सविस्तर माहिती घ्यावी. सदर प्रशिक्षण एल. ई. डी. प्रोजेक्टर च्या सहाय्याने देण्यात येणार आहे. त्यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सदर लस ही ९ महिन्यांपासून ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणार आहे. कळावे. लोभ असावा. आपला विश्वासू, मुख्याध्यापक : विद्यामंदिर मांगवली नं. १ , ता. वैभववाडी
Subscribe to:
Post Comments (Atom)
🛑 कुप्पमातले दिस लय भारी
🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...
-
ज्ञानी मी होणार - मोठा गट - पुष्प ४ थे १ ) ' मी फुल तृणातील इवले ' या कवितेचे कवी को...
-
No comments:
Post a Comment