२६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता शाळेचे ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी मांगवली गावाचे उपसरपंच श्री. संतोष इस्वलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत मांगवलीचे ध्वजारोहण सरपंच श्री. राजेंद्र राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. विविध देशभक्तीपर व जनजागृतीविषयक घोषणा देण्यात आल्या. मुलांना व पालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. त्यावेळी सदर कार्यक्रम अध्यक्ष श्री. राजेंद्र कोलते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ. शारदा शरद कांबळे, जि. प. सदस्या, सरपंच श्री. राजेंद्र राणे, उपसरपंच श्री. संतोष इस्वलकर , सौ. सुवर्णा संसारे ( माजी सभापती ), माजी सरपंच श्री. महेश संसारे, ग्रामसेवक श्री. उमेश राठोड, कृषिसेवक श्री. गवळी, पोलीसपाटील श्री. तानाजी आयरे, उपाध्यक्षा सौ. रुपाली पाटील , शिक्षणतज्ज्ञ सौ. विद्या गांगण , शिक्षक पालक संघ उपाध्यक्षा सौ. वैशाली देवरुखकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. प्रियांका जावडेकर , आरोग्य कर्मचारी व बहुसंख्य पालक व आजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते.
इ. १ ली ते ७ वी पर्यंतच्या सन २०१७-१८ च्या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हास्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
त्यानंतर ' मातृदिन' सोहळा संपन्न झाला. हळदीकुंकू समारंभात मा. शारदा कांबळे यांनी महिलांना उद्देशून मार्गदर्शन केले. मांगवली धनगरवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पल्लवी गायकवाड यांनी महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमाविषयी विशेष माहिती दिली. सौ. रुपाली पाटील यांनी महिलांनी एकत्र येऊन विकास घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देत गाणी गायिली. महिलांचे फनीगेम्स संगीत खुर्ची, मेणबत्त्या पेटवणे , ग्लासात बुचाने पाणी भरणे, भरलेल्या पाण्याच्या टाकीतील वाटीत पैसे टाकणे इत्यादी मनोरंजक खेळ घेण्यात आले. ग्रामपंचायत मांगवली च्या वतीने सर्व महिलांना ' sanitary napkin चे वाटप करण्यात आले.