पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Thursday, November 22, 2018

विद्यार्थ्यांचे वजन व उंची व BMI

परिशिष्ट क्र. १२ - विद्यार्थ्यांचे वजन व उंची व BMI - शाळा - वि. मं. मांगवली नं. १           जावक क्र.१८२ / २२/११/२०१८.



एकूण विद्यार्थी संख्या
BMI १८.५ पेक्षा कमी असलेले विद्यार्थी
BMI १८.५ ते २४.९ असलेले विद्यार्थी
BMI २५ ते २९.९ असलेले विद्यार्थी
BMI ३० पेक्षा जास्त असलेले विद्यार्थी
२९
१०
१५



                                                                                                मुख्याध्यापक ,
                                                                                             वि. मं. मांगवली नं. १
                                                                                              तालुका - वैभववाडी
                                                                                               जिल्हा : सिंधुदुर्ग

सन्माननीय श्री. सतीशजी जागुष्टेसाहेब आणि मा. श्री. शैलेंद्र गुरवसाहेब यांनी आज आमच्या शाळेला सदिच्छा भेट दिली तेव्हा सर्व शिक्षकांना त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ' योगप्रकाश' नावाचे पुस्तक प्रत्येकाला भेट म्हणून दिले. त्रिपुरार्री पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर त्यांनी दिलेली भेट सर्व शिक्षकांना खूपच आवडली. शाळेच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार.


आपण जे पेरतो तेच उगवतं.


Sunday, November 4, 2018

व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.


५ नोव्हेंबर - जागतिक रंगभूमी दिन


English Rhymes & Activities


वाचन प्रेरणा दिन व अब्दुलकलाम जयंती


कार्यानुभव कार्यशाळा


कार्यानुभव कार्यशाळा


विहानचा वाढदिवस सन २०१६


शिक्षक दिन सन २०१६


वनभोजनाचे उद्देश समजावून सांगण्यासाठी बनवलेली चित्रफित सन २०१७


शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण चित्रफित सन २०१७


शालेय प्रवेशोत्सव - १५ जून २०१७


वृक्षारोपण कार्यक्रम सन २०१७


स्वातंत्र्य दिन संचलन सन २०१७


शिक्षक दिन सन २०१७


विहान अजय राव याचा वाढदिवस , स्नेहभोजन व बक्षीस वितरण समारंभ सन २०१७


वेंगसर घाडीवाडी शाळेतील प्रजासत्ताक दिन सन २०१८


शालेय वनभोजन सन २०१८


वार्षिक बक्षीस वितरण व ईशस्तवन सन २०१८


तालुकास्तर समूहगीत सादरीकरण सन २०१८


शैक्षणिक सहल - कोल्हापूर Water Park


प्रजासत्ताक दिन सन २०१८


७ वी च्या मुलांचा निरोप समारंभ सन २०१७-१८


तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण कार्यशाळा


मांगवली नं. १ च्या मुलांनी केले रक्षाबंधन


Saturday, November 3, 2018

शिक्षक दिन - ५ सप्टेंबर

शिक्षक दिन : ५ सप्टेंबर २०१८ : विद्यार्थी शिक्षक नियोजन : विद्यार्थी शिकवणार खालील वर्ग : वि.मं. मांगवली नं. १ : तालुका : वैभववाडी, जिल्हा : सिंधुदुर्ग.

  1. संकेत राजेंद्र कोलते : ७ वी गणित : म. सा. वि. सराव उदाहरणे : तासिका पहिली : ११ ते ११.३०.
  2. ऋतिक रवींद्र आयरे : ७ वी मराठी : सराव प्रकटवाचन व प्रश्नोत्तरे : तासिका दुसरी : ११.३० ते १२
  3. राज अजय जावडेकर : ७ वी इंग्रजी : २५ शब्दांचे लेखन व परीक्षण : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४०
  4. जिग्नेश रमेश कांबळे : ७ वी इतिहास : प्रश्नोत्तरे सराव व सामान्यज्ञान : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०.
  5. पार्थ प्रसाद जावडेकर : ६ वी गणित : अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी : तासिका पहिली : ११ ते ११.३०
  6. दत्तप्रसाद मधुकर जावडेकर : ६ वी मराठी : कवितागायन व पाठांतर : तासिका दुसरी : ११.३० ते १२.००
  7. पार्थ प्रसाद जावडेकर : ६ वी : इंग्रजी : शब्दलेखन व परीक्षण : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४०
  8. दत्तप्रसाद मधुकर जावडेकर : ६ वी इतिहास : प्रश्नोत्तरे सराव व सामान्यज्ञान : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०
  9. पायल प्रदीप लिंगायत : ५ वी गणित : शाब्दिक उदाहरणे सराव : तासिका पहिली : ११ ते ११.३०.
  10. नूतन संदीप लिंगायत : ५ वी : मराठी : कविता गायन व पाठांतर , शब्दलेखन : तासिका दुसरी : ११.३० ते १२.००
  11. पायल प्रदीप लिंगायत : ५ वी : इंग्रजी : शब्दलेखन व  तपासणी : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४०
  12. नूतन संदीप लिंगायत : ५ वी : परिसर/ विज्ञान/सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे: तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०.
  13. सम्राट सुरेश पाटील : १ ली : मराठी : शब्दलेखन व तपासणी : तासिका पहिली : ११ ते ११.३०
  14. सम्राट सुरेश पाटील : १ ली : गणित : संख्यालेखन व तपासणी : तासिका दुसरी : ११.३० ते १२.००
  15. सम्राट सुरेश पाटील : १ ली : इंग्रजी : बडबडगीते गायन व पाठांतर : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४०
  16. सम्राट सुरेश पाटील : १ ली : परिसर : प्राणी, पक्षी, फळे, फुले यांची नावे : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०.
  17. अनन्या अतिश कांबळे : २ री : मराठी : शब्दलेखन व तपासणी : तासिका पहिली : ११ ते ११.३०
  18. सिद्धी प्रवीण जावडेकर : २ री : गणित : बेरजेची उदाहरणे : तासिका दुसरी : ११.३० ते १२.००
  19. अनन्या अतिश कांबळे : २ री : इंग्रजी : शब्दलेखन व तपासणी : तासिका तिसरी : १२.१० ते १२.४०
  20. सिद्धी प्रवीण जावडेकर : २ री : परिसर : प्राणी, पक्षी, फळे, फुले , रंग यांची माहिती : तासिका चौथी व पाचवी : १२.४० ते १.४०.
  21. ४ थी : एकच विद्यार्थी असल्याने या वर्गावर तासिका होणार नाहीत.
  22. दुपारी जेवल्यानंतर ज्यांना कोणतेही विषय शिकवायचे असतील त्यांना शिकवण्याची संधी दिली जाईल. सर्वांनी आपली दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी.
नियोजक : मुख्याध्यापक शाळा विद्यामंदिर मांगवली नं. १ ….तालुका : वैभववाडी, जिल्हा : सिंधुदुर्ग

अंगाईगीत


माझा बाळ गुणाचा गं ....माझा श्याम गुणाचा गं.....
तो होऊ दे मोठा मोठा .....
मग नाही आनंदा तोटा .......
व्हावा लाडका साऱ्यांचा गं....माझा बाळ गुणाचा गं  !! धृ  !!
माझ्या प्राणांचा विसावा तो ....
दृष्टीसमोर दिसावा तो ....
नको लागाया कधीही त्याला ....
वारा दुःखाचा गं ........माझा बाळ गुणाचा गं       !! १  !!
माझ्या प्रेमाची ऊब ही त्याला..
 माझ्या नजरेचा धाकही त्याला ....
मनात रूजवू दे ...
जनात शिकवू दे ....
धडा सत्याचा गं,,,.... माझा बाळ गुणाचा गं......... !!  २  !!
त्याचा सर्वांशी स्नेह जुळावा....
पाय ध्येयाकडेच वळावा....
अंतरंगातून झरा फुटावा ....
विश्वप्रेमाचा गं....माझा बाळ गुणाचा गं.....  !!  ३  !!

एक्सिमो गीत



         आते काते नौवा ......आते काते नौवा
          हे मिसा दे मिसा....... दुल्ला मिसा दे
          एक्सा कोला मिक्सा गोटा
          एक्सा कोला मिक्सा गोटा

मोती होऊन शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ.


विद्यार्थी व पालकांसाठी सूचना : सोमवार दिनांक ५ नोव्हेंबर पासून १९ नोव्हेंबरपर्यंत शाळेला ' हिवाळी सुट्टी ' असल्याने शाळा बंद राहील. २१ नोव्हेंबर पासून बुधवारी शाळा नेहमीप्रमाणे भरेल. विद्यार्थ्यांनी दिलेला अभ्यास वेळच्या वेळी नियमित पूर्ण करावा. सराव अभ्यास असल्याने तो केल्यामुळे आपणास नक्कीच फायदा होईल. शाळा सुरु झाल्यानंतर लवकरच केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा होणार आहेत. त्याचप्रमाणे ' तालुका स्तर विज्ञान प्रदर्शन होणार असल्याने त्याचीही तयारी शाळेत आल्यानंतर करावयाची आहे. तरी नियोजनपूर्वक २ तास तरी वाचन, लेखन यासाठी देणे आवश्यक आहे .



🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...