साळीस्ते दिनांक : २१ सप्टेंबर २०१९ :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून केंद्रशाळा साळीस्ते नं. १ शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समारोप प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष यशवंत ताम्हणकर बोलत होते. ते म्हणाले , मी लहान असताना ४ थी मध्ये शिकत असताना ७ वी च्या मुलांना शिकवत असे. शिक्षकांचा आदर करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. शिक्षक हा मानबिंदू आहे. त्याचे अनुकरण विद्यार्थी करतात. म्हणूनच शिक्षक ही व्यक्ती नसून ती एक वृत्ती आहे, आणि अभिरुची देखील आहे. आज शिक्षकाला समाजात सन्मान दिला जातो.
साळीस्ते शाळेने या दिनाचे उत्तम नियोजन करून शैक्षणिक उपक्रम राबवला. या दिवशी एकूण ८ विद्यार्थी शिक्षकांनी विविध वर्गांवर सर्व विषयांचे अध्यापन करून एक दिवस शिक्षक बनून शिक्षकांप्रमाणेच अनुभूती घेतली. त्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून रोशन कांजीर व चंदना गुरव, दिशा कांजीर , रिया कांबळे, प्राची रांबाडे , नितेश ताम्हणकर, श्रवण लिंगायत, सुजल कांबळे यांनी पदवीधर शिक्षक , उपशिक्षक म्हणून काम पाहिले. नियोजनाप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपापली अध्यापनाची व इतर सोपवलेली कामे परिपूर्ण केली. विद्यार्थी शिक्षक हजेरीवर सह्या केल्या. सूचना वही लिहिली गेली. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. अतिथींकडून अभिप्राय पुस्तिका लिहून घेण्यात आली.
समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षकांची सन्मान सभा घेण्यात आली. त्यावेळी घाडीगावकर, पाष्टे, वळवी ,पारधिये, बुचडे, कुबल इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक दिवस शिक्षक बनल्यानंतर झालेला आनंद प्रत्येकाने अभिव्यक्त केला. शिक्षक म्हणून काम करणे सोपे नसते , त्यासाठी खूप अभ्यास करून वर्गावर जावे लागते असे मत व्यक्त करताना प्रत्येकाने शिक्षकांबद्दल आदरपूर्वक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रिया कांबळे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

No comments:
Post a Comment