पदवीधर शिक्षक , शिडवणे नं. १

Tuesday, December 4, 2018

क्रीडास्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन

                                          हमको मन की शक्ती देना


निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. अशा या मनाला अधिक शक्तिशाली बनवून आपण सर्व मुले अधिक आत्मविश्वासाने आयुष्याचा सामना करण्यासाठी मांगवली नं. १ च्या लहान गटाची मुले सादर करत आहेत समूहगीत …..हमको मन की शक्ती देना ...श्रद्धा विश्वास की भक्ती देना.





                                                     


 नन्हा मुन्ना राही हु


आपण आपल्या भारत देशात राहत असताना त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणून लहानपणापासूनच आपल्या नसानसात देशभक्ती भिनली पाहिजे. आमच्या शाळेचे छोटे सैनिक घेऊन येत आहेत एक हिंदी देशभक्तीपर गीत - नन्हा मुन्ना राही हु ...देश का सिपाही हु ...बोलो मेरे संग ...जय हिंद ..जय हिंद.




                                                         


आम्ही ठाकर ठाकर


आपल्या भारत देशात विविध जातीधर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. भारतात ठाकर, वारली, कोकणा अशा आदिवासी जमातीचे लोकसुद्धा आपली संस्कृती टिकवून ठेवत भारतीय सांस्कृतिक वारसा जपून ठेवत आहेत. ठाकर समाजातील आपले मित्र रानावनात राहून आपल्या संस्कृतीचे जतन करत आहेत. आमच्या शाळेतील छोटी मुले सादर करत आहेत समूहनृत्य…...आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर….




                                         


देशभक्तीपर समूहनृत्य - मोठा गट


    सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यांच्यामुळे आपण सार्वजन आपल्या घरात अगदी शांततेने राहू शकतो. हे सैनिक बांधव आपल्या प्राणांचीही पर्वा न करता आपल्या देशासाठी लढताना ज्या दिव्यातून जातात त्याबद्दल आमचा सर्वांचा त्यांना सलाम आहे,असे आमचे मांगवली नं. १ चे सैनिक घेऊन येत आहेत एक देशभक्तीने ओथंबून वाहणारे समूहनृत्य….

No comments:

Post a Comment

🛑 कुप्पमातले दिस लय भारी

🛑 कुप्पमातले दिस लय भारी आठ तालुक्यातले जमले पंचवीस ठिकाणदार  त्यात दशावताराची चर्चा रंगे लय बहारदार  झिम्मा झिम झिम झिमच्या सुरात नाचले फा...