Free Being Me
२६ व २७ नोव्हेंबर २०१८ रोजी दोन दिवस सिंधुदुर्गनगरीत स्काऊट कार्यालयात फ्री बिंग मी चे प्रशिक्षण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सदर कार्यशाळेत मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी मिळून ५० पेक्षा जास्त स्काऊट आणि गाईड यांचा छान आनंदसोहळा संपन्न झाला. सर्वजण अतिशय आनंदाने खूप काही घेऊन आपापल्या घरी परतले. जाताना स्वतः फ्री झाल्याचा आनंद घेऊनच गेले. खूप भारावून गेले होते सर्वजण. गाईड आणि स्काऊट यांनी दोन दिवस अक्षरशः आनंदोत्सवच साजरा केला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एका वेगळ्या पर्यटनाचा आनंद झाला. लहान मुलांप्रमाणे सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत वयाचे भान विसरून सगळे आनंद लुटताना दिसले. प्रशिक्षण खऱ्या अर्थाने यशस्वी झाले.
जिल्हा समन्वयक सौ. अंजली माहुरे यांनी यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे होते. एका सराईत मार्गदर्शकाप्रमाणे मार्गदर्शन करताना कोणालाही न दुखावता केलेले मार्गदर्शन खूपच प्रेरणादायी ठरले. सर्वांना सर्व उपक्रमात सहभागी करून घेण्याची त्यांची हातोटी खूपच भावली. पंचविशीपासून निवृतीनंतर आलेल्या स्काऊट - गाईडना एकत्र घेऊन काम करताना जे तंत्र वापरायला पाहिजे ते तंत्र अचूकपणे त्यांनी वापरल्याने मस्त मजेत दोन दिवस कधी संपले ते समजलेच नाहीत. कित्येक वर्षांनंतर एका वेगळ्या प्रशिक्षणाचा लाभ आम्हाला झाल्याचे आम्हाला समाधान वाटते आहे.
आपल्या जीवनात असे अनेक क्षण येतात की जे पुन्हा पुन्हा आठवावेसे वाटतात , या प्रशिक्षणातील क्षण अगदी तसेच होते , अविस्मरणीय. सर्वजण आपले वय विसरून जमाडी जंमत करत पुढे पुढे जाताना दिसत होते. खरंच शिक्षकांना सुद्धा कधी कधी असे मोकळे होता आले पाहिजे. रोज रोज मुलांना शिकवताना कधी कधी विद्यार्थीसुद्धा होता आले पाहिजे. कारण ती आजच्या काळाची गरज आहे. शाळेच्या विविध बेसुमार उपक्रमांमधून थोडे बाजूला होऊन आपल्याच वयाच्या माणसांबरोबर आणि ती सुद्धा अनोळखी व्यक्तींबरोबर काही क्षण घालवताना शिकता आले हे आमच्यासाठी मोलाचे आहे. आम्ही भाग्यवान की आमची या कार्यशाळेसाठी निवड झाली.
आमच्या शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे वागणूक देऊन त्यांच्यामधील ताण-तणाव जर आपण लीलया दूर करू शकलो तर आपण करत असलेले कार्य कित्येकांची आयुष्ये पूर्णपणे बदलवून टाकू शकतो, नाही का ? आणि ते तुम्हीच आहात की असा सकारात्मक विचार करून प्रत्येक समस्येचे उत्तर शोधू शकता. शिक्षक म्हणून तुम्ही- आम्ही जे शिकवण्याचे व्रत अंगिकारले आहे ते व्रत जपत जपत मुलांसाठीच काम करत आपण राहिलो तर उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे , कारण तो उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलेलं आहे.
काहीही करा , पण तुमची मुलेही तुमच्यासमोर मोकळी झाली पाहिजेत. त्यांनी आपल्या मनातील विचार नि:संकोचपणे तुमच्याकडे सांगितले पाहिजेत. तुम्ही तुमच्या मुलांसाठी आदर्श असले पाहिजे. तुम्ही त्यांच्यात सुसंस्कारांची रुजवणूक केली पाहिजे. तुमची शाळा तुम्हाला घर वाटली पाहिजे. तुमच्या मुलांना तुमची शाळा घर वाटली पाहिजे. तुमच्यामध्ये त्यांनी आपले आई-बाबा पाहिले पाहिजेत. अगदी तुम्हाला आदर्श पुरस्कार मिळाला नाही तरीही.
महत्त्वाचे आहे की तुम्ही त्याचे अगदी जवळचे मित्र बनायला हवेत. गरजेचे आहे की तुम्ही त्याला आपल्या मुलाप्रमाणेच वागणूक द्यायला हवी. मग त्याला कसे वाटेल की तो शाळेत आलाय म्हणून ? त्याला त्याच्या प्रत्येक अवयवाची जाणीव करून देत असताना सहजपणे करून द्या. त्याला आपल्या शरीराबद्दल कमालीचा आदर निर्माण झाला पाहिजे. त्याने स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. प्रथम आपण सर्व शिक्षकांनी स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. स्वतःवर हसता आले पाहिजे. आपल्याकडील अहंकार बाजूला ठेऊन मुलांसोबत हसता- रडता आले पाहिजे. मुलांचे विश्व समजावून घेत त्यात डोकावता आले पाहिजे.

No comments:
Post a Comment